येवला : भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून शहरात सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविण्यात येत आहे. भाजीपाला, किराणा व औषध खरेदीसाठी किमान अंतर राखले जात असून, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच्या वतीने आता, सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविला जात आहे.येवला शहरात भाजीपाला बाजार नियमित ठिकाणी भरत असताना भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. ही गर्दी कमी करण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे व वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्र ी केंद्र उभारण्याची मागणी सोशल मीडियातून केली जात होती. आज, नगरपालिका प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली.शहरात नगर परिषदेने छोट्या ट्रॅक्टरद्वारे कीटनाशक औषध फवारणी केली. शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातील बल्हेगाव, कातरणी, नेऊरगाव आदी सर्वच ग्रामपंचायती गाव परिसर, वाड्या-वस्त्यांवरही विशेष स्वच्छता व औषध फवारणी मोहीम राबवत आहे.
येवल्यात सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:05 PM
येवला : भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता खबरदारी म्हणून शहरात सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविण्यात येत आहे. भाजीपाला, किराणा व औषध खरेदीसाठी किमान अंतर राखले जात असून, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच्या वतीने आता, सोशल डिस्टन्सिंग पॅटर्न राबविला जात आहे.
ठळक मुद्देनगरपालिका प्रशासनाने याबाबत कार्यवाही केली.