ओझर : येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या डिपीतुन झालेल्या स्पार्किंग मधुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचा वर्कशॉप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएल च्या अग्नीशामक दलातील जवानांनी दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली.मुंबई आग्रा महामार्गावर पगार अॅटो शेजारी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची विद्युत जनित्र (डिपी)असुन शनिवारी (दि.४) सकाळी पावणेनऊच्या सुमारास या जनित्रातुन स्पार्किंग झाले, यावेळी त्या ठिणग्या खाली असलेल्या पालापाचोळ्यावर पडल्या. काही वेळात हा पालापाचोळ्याने पेट घेतला काही क्षणातच जवळच असलेल्या अमीत अहिरे यांच्या सोफासेट वर्कशॉपच्या बाहेर ठेवलेल्या सोफासेटच्या रेक्झिंगने देखील पेट घेतला आणि काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी काही नागरीकांनी पोलीसांना कळविताच ओझर पोलिसांनी सदर माहिती एचएएलच्या अग्नीशामक दलास दिल्या. त्या नंतर एचएएलच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी सुमारे दिड तासाच्या प्रयत्नाने हि आग आटोक्यात आणली. यावेळी मदतीसाठी ओझर पोलीस ठाण्याचे के. बी. यादव, अनुपम जाधव, अनिल काळे, नितिन कारंडे, खांडवे, भुषण शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाले, संजय पगार आदिंनी घटनास्थळी येऊन मदत केली.
डिपीतुन उडालेल्या ठिणगीमुळे सोफासेट वर्कशॉप जळुन खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 8:47 PM
ओझर : येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या डिपीतुन झालेल्या स्पार्किंग मधुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचा वर्कशॉप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएल च्या अग्नीशामक दलातील जवानांनी दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली.
ठळक मुद्दे दिड तासाच्या प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात