देवळा : तालुक्यातील वाखारी येथील सुटीवर घरी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा गणेशमूर्तीचे विहिरीत विसर्जन करतांना विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.
वाखारी येथील प्रशांत वसंत गुंजाळ (२७) हा सैन्यदलात कार्यरत असलेला जवान दोन मिहन्याच्या सुटीवर सहा दिवसांपूर्वीच घरी आला होता. घरातील गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यासाठी प्रशांत आपल्या शेतालगत असलेले शेतकरी अप्पा बोरसे यांच्या गट न. ११४ मधील विहिरीवर गेला. विसर्जन करत असताना अचानक तोल गेल्याने ते विहिरीत पडले. सदरची दुर्दैवी घटना घडल्यानंतर परीसरातील शेतकरी व युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
विहिरीला ३५ ते ४० फूट पाणी असल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे. विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. यावेळी तीन वीजपम्पांच्या मदतीने विहीरीतील पाण्याचा उपसा करावा लागला. विहीरीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पोहणार्या खाकांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.
यावेळी नातेवाईकांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्र ोश केला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गुंजाळ २०१२ साली सैन्य दलात भरती झाले होते. ते सद्या १०६ मेडिअम रेजिमेंट, अरु णाचल प्रदेश येथे सैन्यदलात नायक पदावर कार्यरत असून २५ आॅगस्ट रोजी गावाकडे सुटीवर आले होते. यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असतांना व कुटुंबासमवेत आनंदी क्षण व्यतीत करत असताना गुंजाळ कुटुंबावर अनपेक्षतिपणे हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. प्रशांत यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.