सोनई हत्याकांड; सहा खुन्यांना फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:16 AM2018-01-21T00:16:43+5:302018-01-21T00:26:51+5:30
नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच; परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकेदायक आहे’, अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात ताशेरे ओढत अवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले.

या हत्याकांडात न्यायालयाने रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा, अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुºहे (३३) रा. खरवंडी, ता. नेवासा यांना सोमवारी दोषी ठरविले होते, तर अशोक रोहिदास फलके, रा. लांडेवाडी, सोनई यास दोषमुक्त केले होते. त्यामुळे शनिवारी न्यायालय काय निकाल देते याकडे साºयांचे लक्ष लागून होते.
सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहुल राजू कंडारे ( २६) सर्व रा. त्रिमूर्ती कॉलेज, नेवासा फाटा या तिघा तरुणांचा अतिशय निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता.
२अतिशय गाजलेल्या, जातीयवादाची परिसीमा गाठलेल्या व संवेदनशील असलेल्या या खटल्याचे अहमदनगर जिल्ह्यात पडसाद उमटण्याची शक्यता पाहून नाशिकच्या न्यायालयात हा खटला सुनावणी-साठी वर्ग करण्यात आला होता.कुºहेचा निकालानंतर संताप
अपिलाची मुदत कशाला, लगेचच फाशी द्या़ देशात इंग्रजच बरे होते, निकाल लागला की लगेच फासावर लटकवायचे़ मी दलित आहे याचा उल्लेख निकालात का नाही, डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिले आहे़ मी तुमच्या शिक्षेमुळे नाही तर मी माझ्याच पद्धतीनेच मरणाऱ येत्या दोन-तीन दिवसांत मी मरेल, मला तुमच्या फाशीच्या शिक्षेची गरजच पडणार नाही, असा संताप आरोपी संदीप कुºहे याने न्यायाधीश आपल्या निजी कक्षात गेल्यानंतर व्यक्त केला़पीडितांना मदत नाहीच
सोनई हत्याकांडातील मयतांच्या नातेवाइकांना सरकारी नोकरी तसेच आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते़ मात्र, मयत सचिन घारू व राहुल कंडारे व संदीप थनवार यांच्या नातेवाइकांनी सरकारडून अशा प्रकारची कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले़, तर न्यायाधीश वैष्णव यांनी मयतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदतीबाबत विचारले असता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी मदत मिळाल्याचे सांगितले़