शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

दिवाळीच्या खरेदीला वेग

By admin | Published: October 19, 2014 10:17 PM

दिवाळीच्या खरेदीला वेग

 नाशिक : दिव्यांच्या प्रकाशांनी दाही दिशा उजळवणाऱ्या दिवाळी सणाला सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने बाजारात खरेदीला वेग आला आहे. पणत्या, आकाशकंदील, लाइटिंगमुळे दिवाळी लख्ख प्रकाशात न्हाऊन निघते. या वस्तूंशिवाय दिवाळी पूर्ण होऊच शकत नसल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसत आहे. याबरोबरच कपडे, फटाके, उटणे, सुगंधी तेल, अत्तर यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. बाजारात नव्याने आलेल्या वस्तूंकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. त्यातच औद्योगिक क्षेत्रात दिवाळीचा बोनस मिळू लागल्याने त्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसत असून, खरेदीसाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच गुंतलेले दिसत आहेत. त्यामुळे शहरातील मेनरोड, दहीपूल, शालिमार, नाशिकरोड परिसर गजबजला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिवाळीसाठी आवश्यक वस्तूंच्या किमतीत फारशी वाढ झाली नसली, तरी कपडे, आकाशकंदील यांच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. डिझायनर पणत्या, फायबर प्लास्टिकचा आकाशकंदील यांना चांगली मागणी असल्याने त्याची आवकही बाजारात वाढली आहे. पर्यावरणपूरक म्हणून कापडी आकाशकंदिलांना चांगला भाव आहे. चायना कंदीलही बाजारात आले असले, तरी ग्राहकांनी त्याला नापसंती दर्शविल्याने या कंदिलांचा भाव पूर्णपणे घसरला असल्याचे विक्रेते सांगतात. नोकरदार महिलांसाठी फराळाचे पदार्थ घरी करणे शक्य होत नसल्याने त्यांच्यासाठी तयार फराळाचे खास पदार्थ विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे दिसते. यात शेव, चकल्या, शंकरपाळे, करंज्या या नेहमीच्या पदार्थांबरोबरच गुलकंद करंजी, चिरोटे, नारिंगी लाडू, सफरचंद बर्फी हे फराळाचे नवीन पदार्थही बाजारात आले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत खरेदीची लगबग आणखी वाढणार असल्याची शक्यताही विक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)