आई कोरोना बाधित असल्याचे कळाल्यावर तिला १४ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. यानंतर सहा सात दिवसात आईची प्रकृती स्थिरावत होती. एक दोन दिवसात ती सुखरूप घरी येईल, अशा आनंदात आम्ही होतो. तिची देखील हीच इच्छा होती. परंतु काळरूपी ऑक्सिजन गळतीमुळे ती देवाघरी गेली. आम्ही पाेरके झालो. ही दुर्घटनाच घडली नसती तर आज आई आमच्यात असते. तिची कमतरता व उणीव नेहमीच भासत असते.
-योगेश खैरनार, मुलगा
------------------------
(प्रमोद नारायण वाळूकर)
आई बचावली, भाऊ हिरावला
आई पुष्पलता व भाऊ प्रमोद नारायण वाळूकर हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते. यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. आईची तब्येत हळूहळू चांगली होत गेल्याने तिला जनरल वाॅर्डमध्ये ठेवण्यात आले. प्रमोद याची देखील तब्येत हळूहळू चांगली होत होती. त्याची ऑक्सिजन लेव्हलदेखील ९६ इतकी होती. लवकरच त्याला डिस्चार्ज मिळेल असे वाटत असताना २१ एप्रिलच्या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई बचावली व भाऊ मात्र गमावला.
-परीक्षित वाळूकर, मयताचा भाऊ