पाणी हाच शेतीचा आत्मा : मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:54 AM2018-02-01T00:54:09+5:302018-02-01T00:54:37+5:30

भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांनी केले.

Spirit of Agriculture: More | पाणी हाच शेतीचा आत्मा : मोरे

पाणी हाच शेतीचा आत्मा : मोरे

Next

नाशिक : भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांनी केले.  डॉ. वसंतराव पवार व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प मोरे यांनी ‘जल व्यवस्थापन व नियमन’ विषयावर गुंफले. याप्रसंगी मोरे म्हणाले, पर्यावरणावर अन्याय करून विकास साधणाºया मानवाला त्याच्या दुष्परिणामांचा सामनाही करावा लागत आहे. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न होणे राज्यात व देशात गरजेचे आहे. राज्यात गेल्या ७० वर्षांत सुमारे दीड हजार मोठी धरणे अस्तित्वात आली. देशाच्या एकूण धरणांच्या तुलनेत चाळीस टक्के धरणे आपल्या राज्यात असताना सिंचन क्षेत्र कमी होत असल्याची ओरड केली जाते. ज्या राज्यात धरणे अधिक असतात ती राज्ये अनुकूल नसल्याचा पुरावा ठरतो. दुर्दैवाने महराष्टÑाबाबत असेच घडत असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.

Web Title: Spirit of Agriculture: More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी