स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:12 PM2020-03-22T22:12:33+5:302020-03-22T22:13:00+5:30

नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरांचा किलबिलाट वगळता सारे कसे चिडीचूप. जिल्ह्यातील गावोगावी, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्यांवर, माळरानावर अभूतपूर्व अशी शांतता बघावयास मिळाली.

Spontaneous 'corona' closure! | स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

Next
ठळक मुद्देजगरहाटी थबकली : सारे कसे शांत शांत; गावोगावी जनता कर्फ्यू मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एरव्ही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदला कमी-अधिक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांनी जिवावरचे संकट घेऊन उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या कोरोना विषाणूला पिटाळून लावण्यासाठी रविवारी (दि.२२) घराचा उंबरा न ओलांडणे पसंत केले. माणसांचा कोलाहल थांबल्याने पाखरांचा किलबिलाट वगळता सारे कसे चिडीचूप. जिल्ह्यातील गावोगावी, खेडो-पाडी, वाड्या-वस्त्यांवर, माळरानावर अभूतपूर्व अशी शांतता बघावयास मिळाली.
रस्त्या-रस्त्यांवर पसरलेला सन्नाटा कोरोनाच्या भयावहतेची जाणीव करून देत होता. ‘गो कोरोना’ म्हणतानाच या जीवघेण्या विषाणूला हटविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया वैद्यकीय क्षेत्रातील देवदूतांपासून ते कायदा-सुव्यवस्था राखणाºया पोलिसांपर्यंत साऱ्यांचेच नागरिकांनी आपल्या घरी-दारी टाळ्यांचा गजर तसेच थाळीनाद करून कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत जिल्हावासीयांनी संकटात सापडलेल्या देशाला यानिमित्ताने एकात्मतेचाही संदेश दिला. जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे. या जीवघेण्या विषाणूचे भारतात संक्रमण होऊ नये, याकरिता शासनस्तरावर युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत.हवापालटसाठी आलेल्यांचा काढता पाय१ त्र्यंबकेश्वर : भीतीपोटी एकदा संशयाचे भूत एखाद्याच्या डोक्यावर बसले तर काय केले जाईल ते सांगता येत नाही. हे भूत संपूर्ण गावाच्याच डोक्यावर बसल्यावर तर विचारूच नका. संपूर्ण गाव एक झाल्याने एका निरोगी कुटुंबावर गाव सोडून पळ काढण्याची वेळ आली.२ त्र्यंबकेश्वरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ब्राह्मणवाडे गाव आहे. या गावात पुणे येथील एका कुटुंबाने जागा घेऊन घर बांधले आहे. ब्राह्मणवाडे येथे या कुटुंबापैकी एक महिला राहते. घर बांधण्याचा हेतू एकच होता, कधी काळी उन्हाळ्यात अगर हवापाणी बदलासाठी येऊन राहणे. ३ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील एक कुटुंब हवापालटसाठी ब्राह्मणवाडे येथे आले. ही बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी त्यांना येथे राहण्यास विरोध केला. सरपंच पांडुरंग कोरडे आणि अन्य सहकाºयांनी या कुटुंबाला तुम्ही वैद्यकीय तपासणी करून घ्या असे सुनावले. साफसफाई अन् सर्व्हिस स्टेशन घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्याने अनेकांनी घरातील साफसफाईवर भर दिला तर कुणी आपली वाहने पाण्याने धूवून काढत पार्किंगला सर्व्हिस स्टेशनचे स्वरूप आणले. एरव्ही व्यस्त शेड्यूलमुळे प्रलंबित राहिलेल्या कामांचाही निपटरा करण्याला पसंती देण्यात आली. वेळ घालविण्यासाठी कुणी वाचनानंद मिळविला, तर कुणी गृहिणींना स्वयंपाकात मदत करून हातभार लावला. कोरोनाच्या निमित्ताने एक ा वेगळ्या अनुभूतीला नागरिक सामोरे गेले. गप्पांचा पार सुनासुना...
गप्पांचे फड रंगणारे पार-कट्टे सुने सुने झाले. दुकानांचे शटर्स उघडलेच नाहीत. घराघरांमध्ये आतून कड्या लागल्या गेल्या. निर्मनुष्य झालेल्या रस्त्यांवरील स्मशान शांतता जीवघेण्या कोरोनाची भयावहता अधोरेखित करीत होती.नागरिकांकडून घंटानाद;
टाळ्या वाजवून आभारबच्चे कंपनीने घरातच बुद्धिबळाचे पट मांडत, कॅरमच्या सोंगट्यांशी खेळत, पत्त्यांचा डाव मांडत दिवस घालविला. दिवसभर वृत्तवाहिन्यांवरून अपडेट घेत आप्तस्वकीय, नातेवाइकांची मोबाइलवरून विचारपूस करून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात होता. या अभूतपूर्व बंदमध्ये गावोगावी अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांपासून ते प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांकडून आरोग्यसेवा कार्यरत होती. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार, सायंकाळी अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरात, गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात येऊन टाळ्या वाजवत, घंटानाद-थाळीनाद करून कोरोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावणाºयांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Spontaneous 'corona' closure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.