कोथिंबीर १८ हजार रु पये शेकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:36 PM2019-11-12T23:36:19+5:302019-11-13T00:03:02+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे.
पंचवटी : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे. मंगळवारी (दि.१२) कोथिंबीरला १८ हजार रु पये शेकडा, तर कांदापात साडेपाच हजार आणि मेथी ४२०० व शेपू तीन हजार रुपये बाजारभावाने विक्र ी झाली.
गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर तेजित असल्याने सर्वसामान्य नागरिकांना पालेभाज्या खरेदीसाठी खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. परतीच्या पावसाने शेतातील उभे पीक नाश पावल्याने पालेभाज्या आवक घटली असून, त्यामुळे बाजारभाव टिकून आहे.
मंगळवारी सायंकाळी बाजारसमितीत केवळ २५ टक्के शेतमालाची आवक आली होती. पालेभाज्या दर टिकून असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळच्या जेवणात लागणारा भाजीपाला खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.
मंगळवारी बाजारसमितीत विक्रीला आलेल्या कोथिंबीरच्या प्रति जुडीला १८०, तर कांदापात ५५, मेथी ४२ आणि शेपू ३० रु पये दराने विक्र ी झाल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.