नाशिक : दुसऱ्या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक एसटी विभागांमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे, तर नाशिक विभागात गेल्या वर्षभरापासूनच सदर यंत्रणा कार्यान्वित असल्याने प्रवाशांना स्थानकातच सर्व माहिती उपलब्ध होत आहे. परंतु क्युऑस स्क्रीन लहान असल्याने प्रवाशांना या यंत्रणेचा फारसा उपयोग होत नसल्याचेही दिसून आले आहे.
प्रवासी वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अनेकविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर केला जात आहे. नाशिकमध्ये असलेल्या सुमारे ९०० पेक्षा अधिक गाड्यांना जीपीएस सिस्टीम लावण्यात आलेली आहे. त्यातील काही गाड्यांची यंत्रणा सुस्थितीत नसल्याची बाबवगळता यंत्रणा सुरळीत असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.
---इन्फो--
१) या व्यवस्थेमुळे मार्गावरील गाडी किती किलोमीटरवर आहे, याची माहिती कळण्याबरोबरच गाडीचा वेगही यामुळे कळणार आहे.
२) विशेषत: गर्दीच्या मार्गावरील गाड्यांची जीपीएस यंत्रणा प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरत असून, मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची माहिती तत्काळ मिळत आहे.
३) या यंत्रणेमुळे गाडीची विद्यमान माहिती कळत असल्याने चालकाशी संपर्क करून त्यास सूचना देण्याची व्यवस्था आहे.
-- कोट--
नाशिकमध्ये गेल्या वर्षभरापासून जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असून, गाडीचे लोकेशन कळण्यासाठी याचा फायदा प्रशासनाला आणि प्रवाशांनादेखील होत आहे. सर्वच महत्त्वाच्या आणि मोठ्या बसस्थानकांमध्ये गाड्यांचे लोकेशन कळण्यासाठी स्क्रीन लावण्यात आलेला आहे.
- आर.एन. पाटील, विभाग नियंत्रक
--इन्फो--
स्थानकात लागले मोठे स्क्रीन
१) एसटी बसेसला लावण्यात आलेल्या ट्रॅकिंग सिस्टीममुळे बसेसचे लोकेशन कळण्यासाठी मोठ्या स्थानकांवर स्क्रीन लावण्यात आले असून, काही ठिकाणी मोठ्या आकाराचे स्क्रीन लावले जाणार आहेत.
२) नाशिकमध्ये ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून कार्यन्वित असून, त्याचा लाभही प्रवाशांना होत आहे. ज्या ठिकाणी तक्रारी आहेत तेथील दुरुस्तीबाबतची काळजी घेतली जात असून, काही नवीन स्क्रीन बसविले जाणार आहेत.
३) नाशिकमध्ये ठक्कर बसस्थानकात लावण्यात आलेल्या क्युऑस स्क्रीनचा प्रवाशांना फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे चौकशी कक्षात गाड्यांची विचारणा करणाऱ्यांची संख्या कायम आहे.
--इन्फो--
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’मुळे बसेसचे ट्रॅकिंग होणार असले तरी त्यातून चालकांवरदेखील नियंत्रण ठेवले जात आहे. अनेकदा मार्गावर चालकांकडून बस मध्येच थांबविली जाते. त्यामुळे नियोजित वेळापत्रक बदलते आणि प्रवाशांचा खोळंबा होतो. या प्रकारामुळे महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने या यंत्रणेचा वापर चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठीदेखील होत आहे. अशाप्रसंगी चालकाला तत्काळ सूचना दिली जाते.
(डमी)