एस.टी. वर्कशॉप आग चौकशीला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 06:21 PM2020-01-14T18:21:20+5:302020-01-14T18:22:31+5:30
पथकाची अडचण : केवळ जाबजबाबावरच भर नाशिक : पेठरोडवर पंधरा दिवसांपूर्वी एस.टी. वर्कशॉपला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात ...
पथकाची अडचण : केवळ जाबजबाबावरच भर
नाशिक : पेठरोडवर पंधरा दिवसांपूर्वी एस.टी. वर्कशॉपला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली चौकशी समिती अद्याप कुठल्याही निष्कर्षावर पोहचलेली नाही. सुमारे १२ तास धुमसणाऱ्या आगीत सारेच भस्मसात झाल्याने आगीचे नेमके कारण शोधण्याला मर्यादा आल्याने आता केवळ वैयक्तिक जाबजबाबावरच चौकशी अहवाल अवलंबून असणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या पेठरोडवरील वर्कशॉपमध्ये पंधरा दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. या आगीत महामंडळाचे जुने टायर्स आणि एका बसचा मागील भाग जळाल्याने सुमारे ४.२५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असादेखील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार एस.टी.च्या दक्षता विभागाकडे चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार चौकशीला गती देण्यात आली असून सर्व कारणांचा शोध घेतला जात आहे.
चौकशी समितीने येथील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले आहे शिवाय सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेजही तपासले आहे. परंतु अद्याप त्यातून कोणताही उलगडा झाला नसल्याचे समजते.