...हा डाग चांगला आहे !

By admin | Published: February 16, 2017 11:23 PM2017-02-16T23:23:45+5:302017-02-16T23:23:59+5:30

व्हॉट्स अ‍ॅप डीपी : ‘अधिकार नव्हे राष्ट्रीय कर्तव्य’, मतदानाची स्मार्ट जागृती

This stain is good! | ...हा डाग चांगला आहे !

...हा डाग चांगला आहे !

Next

नाशिक : ‘हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे... हा डाग चांगला आहे...’ अशा प्रकारचे प्रबोधन करणारे ‘डीपी’ सध्या व्हॉट््स अ‍ॅपच्या विविध ग्रुप व व्यक्तींचे दिसू लागले आहेत. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदानाची ‘स्मार्ट’ जनजागृती नेटिझन्स्कडून केली जात आहे.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची सध्या रणधुमाळी शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. नाशिक शहरात महापालिका हद्दीत सुमारे साडेदहा लाख मतदार असून, या मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वच स्तरातून जनजागृती केली जात आहे. मतदान ही लोकशाहीची खरी ताकद असून, मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे, असे आवाहन महापालिका, जिल्हा परिषद, निवडणूक आयोग, विविध सामाजिक संघटनांकडून केले जात आहे. या जागृती अभियानामध्ये सोशल मीडियाही मागे राहिला नसून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सध्या व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सवरून ‘हा डाग चांगला आहे...’ अशी पोस्ट सध्या गाजत आहे. बहुतांश नेटिझन्सकडून ही पोस्ट ‘डीपी’म्हणून अपडेट करण्यात आली आहे.
यामुळे सध्या व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक या सोशल साइट्सवरून मतदान जागृती अभियान अप्रत्यक्षपणे राबविले जात आहे. या पोस्टमध्ये ‘वोट, फॉर इंडिया-बेटर इंडिया’ तसेच रात्रंदिवस धडपडणाऱ्या मतदान यंत्रणा अन् लोकशाहीला तुमचे मतदान अपेक्षित आहे... तो तुमचा अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला आहे. यासोबत डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला मतदान केल्यानंतर लावण्यात आलेल्या शाईचा फोटोही अपलोड करण्यात आलेला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: This stain is good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.