कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून प्रारंभ झाला. श्रीराम नवमी अािण चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे शनिवारी सप्तशृंग गडावर देवीभक्तांनी एकच गर्दी केली होती. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने मागील वर्षापेक्षा यंदा संख्या रोडावली, आज २५ हजार देवी भक्तांनी मनोभावे पूजा करु न देवीचरणी नतमस्तक झाले.सकाळीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यु. एम. नंदेश्वर, श्री सप्तश्रुंगी निवासनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्या डा.ॅ उषा शिंदे, विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाभळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके पाटील, सरपंच राजेश गवळीसह विविध विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत महापूजा होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला.आज रामनवमी असल्याने मंदिरात जाताना रामटप्प्यावरील श्रीराम मंदिरात दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी तीनला भगवतीच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. चैत्रोत्सव काळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे.खान्देशातून देवी दर्शनासाठी आसुरलेले पाय मजल दरमजल करीत सप्तशृंग गडाकडे निघाल्याने जळगाव, धुळे, मालेगाव, सटाणा, कळवण, नांदूरी रस्त्यावरील पदयात्रेमुळे सप्तशृंगगडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलू लागले आहेत. या देवीभक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो देवीभक्तांनी सप्तशृंग मातेच्या चरणी लीन होवून दर्शन घेत आपली इच्छा प्रकट करु न आशीर्वाद मागितला.ऐन चैत्रातील रणरणत्या जवळपास ४० अंश डिग्री तापमानाच्या कडक उन्हात विविध वयोगटातील स्त्री-पुरु ष, अबालवृद्ध कसलीही पर्वा न करता उन्हाच्या झळा अंगावर घेत सप्तशृंग गडाकडे मार्गक्र मण करताना दिसून येत आहेत. शासन, प्रशासनाने व सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत यांनी भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी नियोजन केले आहे.आदिमाया सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला उत्तर महाराष्ट्रातील देवी भक्तांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेने चालत आलेला हा चैत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीय वाढ होत आहे. चैत्रोत्सव कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्ती भावाने देवीचरणी नतमस्तक होतात.चैत्रोत्सवात होते भक्तांची वाढचैत्र मिहन्यात रामनवमीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत हा चैत्रोत्सव सुरू असतो. आदिमाया सप्तशृंगी देवीची दररोज पंचामृत पूजा केली जाते. गडावर येणारे भाविक नवस फेडत असतात. रामनवमीपासून सुरू होणारा हा उत्सव वाढत जावून पौर्णिमेपर्यंत भक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठलेला असतो. या काळात मालेगाव, सटाणा, वसाका रोड,भेंडी फाटा, कळवण, नांदूरी या रस्त्यावर पायी चालणाºया भाविकांची वर्दळ जास्त असते. या भाविकांसाठी विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक मंडळे यांच्याकडून भक्तांसाठी पाणपोई, उसाचा रस, महाप्रसाद, भोजन दिले जावून भाविकांचे आदरातिथ्य राखले जात असल्याने ठिकठिकाणी त्याची पूर्व तयारी सुरु झाली आहे. डीजेच्या तालावर जगदंबेचा उदो उदो करीत अनेक भाविक आपआपल्या ग्रुपने सप्तशृंग गडाकडे मार्गस्थ झाला असून धुळे, अमळनेर, शिरपूर भागातील देवीभक्त आदिमायेचा जयजयकार करत डीजेच्या तालावर सप्तशृंगी देवीची गाणी लावून भगवतीचा जयजयकार करत देवी भक्त सप्तशृंग गडाच्या दिशेने पुढे सरकत आहे.चैत्रोत्सव काळात देवी मंदिर २४ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून सकाळी ११ ते रात्री १०.३० या कालावधीत श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टचे प्रसादालय भाविकांसाठी खुले राहणार आहे. तसेच भक्तनिवास, आरोग्यव्यवस्था उपलब्ध राहणार आहे. श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टच्या माध्यमातून हंगामी कर्मचारी यात्राकाळात सेवा बजावतील, चैत्रोत्सवात भाविकांनी स्वच्छतेची काळजी घेत प्लास्टिक मुक्त यात्रा पार पाडावी. प्रशासनाला सहकार्य करून दर्शनाचा लाभ घ्यावा.-सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक,श्री सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्ट सप्तश्रुंग गड.
सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 6:19 PM
कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून प्रारंभ झाला. श्रीराम नवमी अािण चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे शनिवारी सप्तशृंग गडावर देवीभक्तांनी एकच गर्दी केली होती. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने मागील वर्षापेक्षा यंदा संख्या रोडावली, आज २५ हजार देवी भक्तांनी मनोभावे पूजा करु न देवीचरणी नतमस्तक झाले.
ठळक मुद्देकळवण : २५ हजार भक्त झाले देवीचरणी नतमस्तक