सिन्नर येथे मुख्यमंत्री चषक महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 07:06 PM2018-12-09T19:06:39+5:302018-12-09T19:10:06+5:30
देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवातील मुख्यमंत्री चषक स्पर्र्धेच्या सिन्नर येथे स्पर्धांना रविवार (दि.९) रोजी शानदार प्रारंभ झाला. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव मुख्यमंत्री चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील उदयोन्मुख कलाकारांना, खेळाडूंना आणि व्यावसायिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरीता शिव सरस्वती फाउंडेशनच्या वतीने सिन्नरला प्रथमच क्र ीडा, सांस्कृतिक व खाद्य महोत्सवाचे येथील आडवा फाटा परिसरातील वंजारी समाज मैदानावर आयोजित केला आहे. मुख्यमंत्री चषक उद्घाटन प्रसंगी व्यासपिठावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन ठाकरे, युवामोर्चा प्रदेश चिटणीस गितांजली ठाकरे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सनी सानप, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय राजभोज, विजय बनसोडे, शिवसरस्वती फाऊंडेशनच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, माजी सभापती अरूण वाघ, कचरु डावखर, अॅड. राजेंद्र चव्हाणके, भाजपाचे ज्येष्ठनेते भाऊसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शहराध्यक्ष पंकज जाधव, बाळासाहेब हांडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक संतोष शिंदे, सुहास गोजरे, मल्लु पाबळे, शितल कानडी, प्रिती वायचळे, वासंती देशमुख, कृष्णकांत कासार, पांडुरंग वारूंगसे, केरु पवार, अशोक मोरे, मंगला गोसावी, सविता कोठुरकर आदी उपस्थित होते. सिमंतिनी कोकाटे यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील तरूण खेळाडूंना व्यासपिठ मिळावे यासाठी सी.एम. चषक क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपिठ उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले. राज्यभर विधानसभा निहाय १२ विविध स्पर्धा घेण्यात येत असून यातील विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय, विभागस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.