ड्रायपोर्टसाठी निसाकाची जमीन मोजण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:07 AM2018-04-16T01:07:36+5:302018-04-16T01:07:36+5:30

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर ड्रायपोर्ट उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महसूल विभाग आणि भूमापन कार्यालयाच्या वतीने जमीनच्या मोजणीस शनिवारी प्रारंभ झाला.

Start counting the land of Nissau for the driver | ड्रायपोर्टसाठी निसाकाची जमीन मोजण्यास प्रारंभ

ड्रायपोर्टसाठी निसाकाची जमीन मोजण्यास प्रारंभ

Next
ठळक मुद्देर ड्रायपोर्ट उभारणीच्या हालचाली सुरू निसाकाची चाके पुढील हंगामात फिरु शकतील, असे जानकारांचे मत

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर ड्रायपोर्ट उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महसूल विभाग आणि भूमापन कार्यालयाच्या वतीने जमीनच्या मोजणीस शनिवारी प्रारंभ झाला.
निसाकाची मालमत्ता सध्या जिल्हा बॅकेच्या ताब्यात आहे. या मालमत्तेपैकी १०८ एकर जमीन जेएनपीटीला ड्रायपोर्ट उभारणीसाठी १०५ कोटी रु पयांत देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँक पदाधिकाºयांसह बैठकही घेतली आहे. थकीत कर्जापोटी जिल्हा बॅँकेने एकरकमी कर्जफेड अंतर्गत एकशे पाच कोटीत जिल्हा बॅँकेने निसाकाला कर्जातुन मुक्त करावे अशी सहकारमंत्र्यांची सूचना आहे. त्यासाठी बॅँकेने नाबार्डकडे प्रस्ताव पाठवावा असेही सूचित केले आहे.
असा प्रस्ताव सादर करणे, मंजुरी मिळविणे, जेएनपीटीकडे जमीन आणि बॅँकेकडे एकशे पाच कोटी वर्ग होणे हे सर्व दोनअडीच महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाले तर पुढील हंगामासाठी निसाकाला हंगामपूर्व कामे, कर्जल करारमदार करण्यास वेळ मिळून निसाकाची चाके पुढील हंगामात फिरु शकतील, असे जानकारांचे मत आहे.
चाके फिरावी
पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौºयावर येत असून, त्यावेळेस या प्रक्रि येस अधिक चालना मिळू शकेल अशीही चर्चा आहे. दरम्यान महसूल यंत्रणा, भूमापन खात्याने १०८ एकर जमीन मोजणीस प्रारंभ केला आहे. निफाडचे प्रांत महेश पाटील यांनी यासंदर्भात शुक्र वारी निसाका कार्यस्थळाला भेट दिली. त्याचप्रमाणे बॅँॅक पातळीवरील प्रस्तावासंबंधी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. या प्रस्तावावर लवकर कार्यवाही होऊन निसाकाची चाके सुरू व्हावी, अशी ऊस उत्पादकांसह निफाडकरांची इच्छा आहे.

Web Title: Start counting the land of Nissau for the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.