गांधी उत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:45 AM2019-10-01T01:45:11+5:302019-10-01T01:45:40+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येथील कुसुमाग्रज स्मारकात आयोजित गांधी उत्सव कार्यक्र माचे आणि गांधी चित्र प्रदर्शनाचे उद््घाटन ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर यांच्या हस्ते झाले.
नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त येथील कुसुमाग्रज स्मारकात आयोजित गांधी उत्सव कार्यक्र माचे आणि गांधी चित्र प्रदर्शनाचे उद््घाटन ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर यांच्या हस्ते झाले. यावेळी जीवन उत्सव परिवाराचे गौतम भटेवरा, श्रीकांत नावरेकर, मुकुंद दीक्षित, सुहासिनी खरे, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोक संपर्क अभियानचे अधिकारी पराग मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये दि. ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात गांधी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ११ ते रात्री ८.३० दरम्यान नाशिककरांना लाभ घेता येईल. दरम्यान, सोमवार सकाळपासून नाशिकमधील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांसह अनेक नाशिककरांनी गांधी उत्सवातील गांधी चित्रप्रदर्शन, गांधी फिल्म्स यासह कापूस ते कापडापर्यंत हे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. तसेच विशाखा सभागृहात सकाळच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विविध शाळा, महाविद्यालयातील
तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महात्मा गांधींच्या जीवन विचारावर विचार मांडले.
कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात दि. २ आॅक्टोबरपर्यंत महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान, चर्चासत्र, मुक्तनाटिका, गांधी भजने, पथनाट्य यांसारख्या कार्यक्रमांचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे.
आजचे कार्यक्र म
मंगळवार, दि. १ रोजी केटीएचएम कॉलेजच्या जिमखाना मैदान येथे गांधीजींचे विशाल रेखाचित्र आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सकाळी ११ ते दु. ३ दरम्यान पथनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न होईल. सायंकाळी ६ ते ८.३० दरम्यान याच सभागृहात ‘गांधीजी : सरळ आणि गहन’ या विषयावर ज्येष्ठ गांधी विचारक रमेश ओझा यांच्या विचारांचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर इचलकरंजी येथील स्मिता पाटील नाट्यमंडळातर्फे गांधींचं करायचं काय? ही मुक्तनाटिका सादर होणार आहे.