महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:09 PM2019-03-03T16:09:57+5:302019-03-03T16:10:03+5:30
सर्वतीर्थ टाकेद ,(राजेंद्र गायकवाड):इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा सर्वतीर्थ टाकेद क्षेत्री भरते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेस शेजारील जिल्हा व परिसरातून लाखो भाविक स्नान व दर्शनासाठी येत असतात.
सर्वतीर्थ टाकेद ,(राजेंद्र गायकवाड):इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे महाशिवरात्री यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा सर्वतीर्थ टाकेद क्षेत्री भरते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेस शेजारील जिल्हा व परिसरातून लाखो भाविक स्नान व दर्शनासाठी येत असतात.
यात्रेसाठी एसटी महामंडळाने इगतपुरी आगारातून, घोटी व भगूर अकोले येथून बसेसची व्यवस्था केली असल्याची माहिती इगतपुरी आगारप्रमुख संंदीप पाटील यांनी दिली आहे. तसेच यात्रेमध्ये पोलीस खात्यामार्फत पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी व विलास घिसाडी, सहायक उपनिरीक्षक बी.आर. जगताप यांनी बंदोबस्त तैनात केला आला आहे.
या ठिकाणी शेकडो कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ग्रा.पं. टाकेदमार्फत सर्वांना पिण्यासाठी पाण्याच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच सुनंदा धादवड, ग्रामविकास अधिकारी आर.आर. इंगळे यांनी दिली. तसेच आरोग्य खाते, खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.आर. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम.बी. देशमुख, भारती सोनवणे, संतोष लेकुळे आरोग्य विभागाचे स्टॉल्स लावण्यात येणार आहे.
तसेच धार्मिक विधी रात्री १२ वाजता सुरू करून यात्रेस प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्य विश्वस्त महंत किशोरदास गुरु गोदावरीदास वैष्णव यांनी दिली.
तसेच विद्युत वितरण कंपनीमार्फत कनिष्ठ अभियंता तुषार राणे व सहायक अभियंता पाटील यांच्यासह म्हसाळ, वसंतराव बोडके, गणेश दौंड हे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी दक्षता घेणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन सरपंच बाळासाहेब घोरपडे, उपसरपंच सुनंदा धादवड, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र परदेशी, विक्र मराजे भांगे, यशवंत धादवड, बबाबाई जाधव, गंगूबाई भले यांनी केले आहे.