राष्ट्रीय जीएसटी परिषदेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:31 AM2018-11-24T00:31:56+5:302018-11-24T00:32:32+5:30

जीएसटी येऊन जवळजवळ दीड वर्षे पूर्ण झाले आहे. या दीड वर्षांत वेगवेगळे जीएसटी रिटर्न व्यापाऱ्यांनी भरलेले आहे आणि आता या सर्व रिटर्न तपशील म्हणजेच वार्षिक जीएसटी रिटर्न आणि जीएसटी आॅडिटमध्ये द्यायच्या आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असून, त्या अनुषंगाने जीएसटी वार्षिक विवरण जीएसटी आॅडिट फॉर्ममध्ये द्यावयाचा तपशिलांचा सखोल अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जीएसटी रिटर्नचे काम करताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया सनदी लेखापालांना याविषीय सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक चार्टड अकाउंटंटची नाशिक व औरंगाबाद सीए शाखेतर्फे राष्ट्रीय जीएसटी परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात झाली.

The start of the National GST Conference | राष्ट्रीय जीएसटी परिषदेला सुरुवात

असोसिएशनच्या राष्ट्रीय जीएसटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना राज्य वस्तू व सेवाकर आयुक्त श्रीकांत पाटील व उपायुक्त कमिशनर संजय पोखरकर यांच्या यांच्यासह मिलन लुणावत, सचिन लाठी आदी.

Next
ठळक मुद्देसीए असोसिएशन : रिटर्नविषयी मार्गदर्शन; दोन दिवस लेखापरीक्षणावर चर्चा

नाशिक : जीएसटी येऊन जवळजवळ दीड वर्षे पूर्ण झाले आहे. या दीड वर्षांत वेगवेगळे जीएसटी रिटर्न व्यापाऱ्यांनी भरलेले आहे आणि आता या सर्व रिटर्न तपशील म्हणजेच वार्षिक जीएसटी रिटर्न आणि जीएसटी आॅडिटमध्ये द्यायच्या आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असून, त्या अनुषंगाने जीएसटी वार्षिक विवरण जीएसटी आॅडिट फॉर्ममध्ये द्यावयाचा तपशिलांचा सखोल अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे
आहे. त्यामुळे जीएसटी रिटर्नचे काम करताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया सनदी लेखापालांना याविषीय सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक चार्टड अकाउंटंटची नाशिक व औरंगाबाद सीए शाखेतर्फे राष्ट्रीय जीएसटी परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात झाली.
आयसीएआय व आयडीटीसीच्या अंतर्गत या दोन दिवसीय राष्ट्रीय जीएसटी परिषदेला शुक्रवारी (दि.२३) प्रमुख पाहुणे नाशिक विभागाचे राज्य वस्तू व सेवा कर आयुक्त श्रीकांत पाटील व उपायुक्त कमिशनर संजय पोखरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. प्रारंभी सीए शेफाली गिरिधारीवाल यांनी जीएसटी आॅडिट करण्याविषयी मार्गदर्शन करताना आॅडिटरची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
या परिषदेला नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलन लुणावत, उपाध्यक्ष रेखा पटवर्धन, सचिव रणधीर गुजराथी, ट्रेझर हर्षल सुराणा, डब्ल्यूआयसीएएसए अध्यक्ष रोहन आंधळे, माजी अध्यक्ष विकास हासे, रवि राठी, डब्ल्यूआयसीएएसएचे माजी अध्यक्ष राजेंद्र शेटे, औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष सचिन लाठी यांच्यासह नाशिक आणि औरंगाबाद येथून सुमारे पाचशे सीए सहभागी झाले आहेत.
विविध कलमांचा तपशीलवार अभ्यास
द्वितीय सत्रात औरंगाबादचे वस्तू व सेवाकर अधीक्षक दीपक गुप्ता यांनी पुरवठ्याचे ठिकाण आणि त्यानुसार करण्यात आलेली जीएसटी आकारणी याविषयी मार्गदर्शन केले.
४तिसºया सत्रात जीएसटी आॅडिट फॉर्ममध्ये असलेल्या विविध कलमांचा तपशीलवार अभ्यास आणि त्याचे सखोल मार्गदर्शन सीए आसित शहा यांनी केले.

Web Title: The start of the National GST Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.