खामखेडा परिसरात कांदा लागवडीची लगबग
By admin | Published: December 8, 2015 11:55 PM2015-12-08T23:55:11+5:302015-12-08T23:56:33+5:30
खामखेडा परिसरात कांदा लागवडीची लगबग
खामखेडा : चालू वर्षी उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने सध्या परिसरात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे. चालू वर्षी उन्हाळी कांद्याला चागला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची नजर आता उन्हाळी कांद्याकडे वळली आहे. यावर्षी विहिरींना पाणी कमी असल्यामुळे शेतकरी आता पांरपरिक पद्धतीने शेती न करता अत्याधुनिक ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गादी वाफा पद्धतीने कांदा लागवड करताना दिसत आहेत.
गादी वाफा पद्धतीने म्हणजे वाफा तयार न करता दोन ते अडीच फूट रु ंद आणि दीड फूट उंचीचा वरबा तयार करून त्यावर कांदा लागवड केल्यानंतर त्यावर ठिबकची नळी वरब्याच्या माथ्यावर पसरून त्या नळीस ठरावीक अंतरावर
ठिबक जोडण्यात येते. म्हणजे ठिबकचे पाणी सोडल्यावर वरबा पूर्णपणे ओला झाला पाहिजे. सध्या विजेचे भारनियमन असल्याने शेती पंपासाठी चोवीस तासापैकी फक्त आठ तास विद्युतप्रवाह मिळतो. त्यातही अनेक वेळा पुरवठा खंडित होत असतो.
या ठिबक सिंचनामुळे पिकाला पाणी भरण्यासाठी माणूस लागत नाही. पिकांना खते-खाद्यही या ठिबकच्या साह्याने देता येते. त्यामुळे पिकांना पाणीही कमी लागते. गादी वाफा या ठिबकमुळे जमीन भुसभुशीत राहते. (वार्ताहर)