इगतपुरी तालुक्यात राब भाजणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:30 PM2020-05-18T21:30:39+5:302020-05-19T00:28:20+5:30
वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
या दिवसात सहसा मजुरीवर जाणारा नागरिक लॉकडाउनमुळे घरी बसला आहे. त्यातच शेतीची कामे सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला आहे. इगतपुरी तालुक्यात पेरणीपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये नागली, भात, वरई पिकांसाठी आदर लावण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे कोणतेही संकट नसले तरी पुरेपूर दक्षता बाळगत शेतकरीवर्ग दिवसभर शेतातील कामासाठी वेळ देत आहेत. लॉकडाउनचा परिणाम अधिकतर शहरी भागात जाणवत असून ग्रामीण भागात फारशा अडचणी येत नसल्याने शेतकरी शेतकामात व्यस्त आहेत. शेतमजुरांना कामे उपलब्ध झाल्याने मशागतीच्या कामाना वेग आला
आहे.
---------------------------------
पर्यावरण संदेश
आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या
निरु पयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो.