नाट्यगृह त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:21 AM2021-08-17T04:21:43+5:302021-08-17T04:21:43+5:30

नाशिक : महाराष्ट्र शासनाने प्रयत्नपूर्वक जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न चालविला असल्याने नाट्यगृहदेखील त्वरित सुरू करण्याची मागणी नाटककार आशुतोष पोतदार ...

Start the theater now | नाट्यगृह त्वरित सुरू करा

नाट्यगृह त्वरित सुरू करा

Next

नाशिक : महाराष्ट्र शासनाने प्रयत्नपूर्वक जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न चालविला असल्याने नाट्यगृहदेखील त्वरित सुरू करण्याची

मागणी नाटककार आशुतोष पोतदार यांनी केली आहे. अभ्यास दौऱ्यासाठी नाशिकमध्ये आलेले नाटककार आशुतोष पोतदार यांनी सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत नाटककार दत्ता पाटील, समीक्षक डॉ. भास्कर ढोके उपस्थित होते. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी त्यांचे स्वागत केले व नाट्यगृहाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. सर्व काही सुरळीत होत असताना अजूनही नाट्यगृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. मराठी माणूस हा नाट्यवेडा म्हणून ओळखला जातो. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे मराठी माणसाची सांस्कृतिक कोंडी झाली होती. सर्वच क्षेत्रात नियमांना शिथिलता देण्यात आल्याने नाट्यगृह त्वरित सुरू करावे, अशी अपेक्षा प्रसिध्द नाटककार आशुतोष पोतदार यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहाची पाहणी करताना व्यक्त केली. यावेळी नाटककार पोतदार म्हणाले, काळानुरूप साईखेडकर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. जगभरात थिएटर बदलते आहेत. नवे तंत्रज्ञान रंगभूमीसाठी वापरले जात आहे. त्याप्रमाणे पुढील काळात साईखेडकर नाट्यगृहात बदल झाले तर त्याचे स्वागत नाट्यरसिक करतील. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा. सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी उपस्थित होते.

Web Title: Start the theater now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.