प्रभाग आठमध्ये लसीकरण केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:47+5:302021-05-20T04:15:47+5:30

सातपूर प्रभाग क्रमांक ८ हा लोकसंख्येच्या दृष्टीने तसेच भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असा प्रभाग आहे. सध्या प्रभागात कोविडचा प्रादुर्भाव शहरातील इतर ...

Start a vaccination center in ward eight | प्रभाग आठमध्ये लसीकरण केंद्र सुरू करा

प्रभाग आठमध्ये लसीकरण केंद्र सुरू करा

Next

सातपूर प्रभाग क्रमांक ८ हा लोकसंख्येच्या दृष्टीने तसेच भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असा प्रभाग आहे. सध्या प्रभागात कोविडचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागातील प्रादुर्भावाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये केवळ गंगापूर रुग्णालयात लसीकरण केंद्र चालू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी केवळ १०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. तथापि प्रभागातील सावरकरनगर, शंकरनगर, आनंदवल्ली, नरसिंहनगर, नवश्या गणपती परिसर, संत कबीरनगर, काळेनगर, गुरुकुल, वनविहार, गणेशनगर, कामगारनगर, शारदानगर, अयोध्या कॉलनी, दादोजी कोंडदेवनगर या परिसरातील नागरिकांसाठी गंगापूर रुग्णालय अतिशय दूर पडत असून, त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना लस घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून आनंदवल्ली मनपा शाळा अथवा सावरकरनगर येथील नवरचना शाळा यापैकी एका ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Start a vaccination center in ward eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.