सिडको : मुंबई-आग्रा महामार्ग शहरातून जात असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी याठिकाणी पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव जीव धोक्यात घालून उड्डाणपुलावरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला पायी ये-जा करावी लागते. काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जाणाºया वाहनांमुळे अपघात होऊन काहीजण जखमी झाले असून, काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत पाठपुरावा करून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले असून, यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. सिडकोतील स्टेट बॅँक ते राजीवनगर याठिकाणच्या भुयारी रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार सीमा हिरे बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने रा.म. मा.क्र . ३ मुंबई-आग्रा महामार्ग हा रस्ता नाशिक शहरातून जातो. या महामार्गावर नाशिक शहरादरम्यानच्या लांबीमध्ये उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला केल्यानंतर अनेक समस्या निर्माण झाल्या व त्याचा त्रास सिडकोच्या जनतेला होऊ लागला. उड्डाणपुलामुळे शहरातील महत्त्वाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाºया द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी यामुळे कमी होईल, असे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही. याप्रसंगी नगरसेवक सतीश सोनवणे, अॅड. श्याम बडोदे, नीलेश ठाकरे, नगरसेवक छाया देवांग, प्रतिभा पवार, भाजपा सिडको मंडल अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेश हिरे, जगन अण्णा पाटील, चारु हास घोडके, आर.आर. पाटील, सचिन कुलकर्णी, सुहास देशपांडे, दिलीप देवांग, परमानंद पाटील, अनिल कासार, अशोक पवार, रमेश विखरणकर, गणेशपवार, सनी रोकडे, पिंटू काळे, मनोज बिरार, शोभा सोनवणे, आदी उपस्थित होते.मंजूर करण्यात आलेली कामेइंदिरानगर -गोविंदनगर बोगद्याजवळ मुंबईकडून येणारा डाउन व मुंबईकडे जाणारा अप हे दोन्ही पर्याय बंद करणे व याठिकाणी असलेला सर्व्हिसरोड मोठा करणे.बोगद्यापासून मुंबई नाक्याकडे जाणाºया व येणाºया सर्व्हिस रोडवरील दुभाजक काढून तोदेखील मोठा करणे.भुजबळ फार्म व एसटीपीकडे जाणाºया डीपीरोड समोरील बाजूस धुळे, मालेगाव येथे जाण्यासाठी अप देण्यात यावा.हॉटेल साईसाया ते पेठेनगर दरम्यानच्या अंतरामध्ये मुंबईकडे जाण्यासाठी अप देण्यात यावा.मुंबईकडून येताना स्टेट बँक चौक येथील कार्तिकेय सर्व्हिस सेंटरजवळ डाउन देण्यात यावा.धुळे, मालेगावकडून येताना सिडको व परिसरात जाणाºया वाहनांना स्प्लेंडर हॉल परिसरात डाउन देण्यात यावा. या सहा पर्यायांची मागणी करण्यात आली होती. हायवे प्राधिकरणाने हे सहाही पर्याय मंजूर केले असून, त्याची कामे पूर्णत्वास येत असल्याचेही आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.
राजीवनगर पादचारी भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:08 AM