नाशिक - वणी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:15 PM2019-11-25T23:15:33+5:302019-11-25T23:16:24+5:30

पांडाणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक - वणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये २३ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लखमापूर ते ओझरखेड खड्ड्याचे साम्राज्य असल्यामुळे रोज नोकरीनिमित्ताने नाशिकला जाणारे चाकरमान्याच्या कटकटी वाढल्या होत्या.

Starting from Nashik to Wani road | नाशिक - वणी रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

नाशिक ते वणी रस्त्याचे सुरू असलेले काम.

Next
ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : बांधकाम विभागाकडून तातडीने दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक - वणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत ‘लोकमत’मध्ये २३ नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लखमापूर ते ओझरखेड खड्ड्याचे साम्राज्य असल्यामुळे रोज नोकरीनिमित्ताने नाशिकला जाणारे चाकरमान्याच्या कटकटी वाढल्या होत्या.
परंतु सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रस्ता दुरुस्तीला वेग आला असून, पूर्ण रस्ता दुरु स्त करावा, अशी मागणी भाविक व प्रवाशी करीत आहेत.
कार्तिक महिन्यातील आळंदी यात्रा झाल्यानंतर भाविक त्र्यंबकेश्वर येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकराजाचे दर्शन झाल्यानंतर पंचवटी येथील श्रीरामप्रभूच्या दर्शनानंतर भाविक साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. परंतु नाशिकहून प्रवास करत असताना ढकांबे, तळेगाव, दिंडोरी, आवनखेड, लखमापूर फाटा पाटबंधारे कॉलनी, ओझरखेड, ओझरखेड नर्सरी व वणी, चंडिकापूर, चादरी, अहिवंतवाडी फाटा या महत्त्वाच्या गावाजवळ रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता म्हणण्याची वेळ भाविकांवर आली होती.

Web Title: Starting from Nashik to Wani road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.