राज्याचे कृषी सचिव शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:36 PM2020-07-05T18:36:08+5:302020-07-05T18:36:48+5:30
निफाड : तालुक्यातील उगाव येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी संजीवनी सप्ताहात उगाव येथे भेट देऊन श्री श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटाच्या वतीने राबवण्यात येणाºया सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली.
निफाड : तालुक्यातील उगाव येथे राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी संजीवनी सप्ताहात उगाव येथे भेट देऊन श्री श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटाच्या वतीने राबवण्यात येणाºया सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली.
याप्रसंगी सेंद्रिय शेतीचे महत्व आणि गरज यावर एकनाथ डवले यांनी मार्गदर्शन केले. तसेच गटामार्फत उत्पादित करीत असलेल्या भाजीपाला पिकांच्या लागवडीची पाहणी केली. या गटाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या शेतात रु ंदसरी व वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी करताना पाहणी केली. रु ंदसरी, वरंबा पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड लागवडीचे फायदे तसेच त्यासाठी लागणारे बियाण्याची बचत, उत्पादनात होणारी वाढ याविषयी चर्चा केली.
तसेच मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे, सापळा पिके, पक्षी थांबे, निंबोळी अर्काची फवारणी या विषयी चर्चा केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर शेतकऱ्यांनी प्रभावीपणे अवलंब करावा असे आवाहनही डवले यांनी केले. यावेळी डवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
एकनाथ डवले यांनी मौजे चेहडी येथे सोयाबीन पिकावरील शेतकरी शेतीशाळा वर्गास भेट देऊन सोयाबीन पिकासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी डवले यांनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजीव पडवळ, निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील, मंडळ कृषी अधिकारी वरु ण पाटील, कृषी पर्यवेक्षक गायमुखे, कृषी सहाय्यक धर्माधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.