सिन्नरला शेतीविषयक राज्यस्तरीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 05:24 PM2018-10-08T17:24:00+5:302018-10-08T17:26:00+5:30

सिन्नर येथे एकात्मिक बागवानी विकास अभियानांतर्गत व  बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान कुंदेवाडी यांच्यावतीने शेतीविषयक राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार राजाभाऊ वाजे होते.

State level seminars on Sinnar | सिन्नरला शेतीविषयक राज्यस्तरीय चर्चासत्र

सिन्नरला शेतीविषयक राज्यस्तरीय चर्चासत्र

Next

भाजीपाला मुख्यत्वे कांदा, लसुण आणि बटाटा आदि उत्पादनाची लवचिकता व शेतकऱ्यांच्या नफा दुप्पट करणे हेतू चालना या दोन दिवशीय चर्चा सत्राचे उद्घाटन वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपिठावर एनएचआरडीएफचे माजी संचालक यु. बी. पांडे, निवृत्त अतिरिक्त संचालक डॉ. एस. आर. भोंडे, उपसंचालक एच. पी. शर्मा, तंत्र सहाय्यक बी. पी. रायते, पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन सानप, मंडळ कृ षी अधिकारी भास्कर सातपुते आदिंसह मान्यवर उपस्थित होते. जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी शेणखताबरोबर हिरवळीच्या खतांचा वापर करावा, दुष्काळी परिस्थितीनुसार शेतकºयांनी पिकांचे नियोजन करावे असे आवाहन वाजे यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये कांदा लसूण व बटाटा उत्पादन आणि निर्यात संधी याविषयी डॉ. एस. आर. भोंडे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात बटाटा उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान व बटाटा पिकाचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन याविषयी पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. आर. देशमुख यांनी याविषयावर माहिती दिली. राज्यस्तरीय चर्चा सत्रात तालुक्यातील सुमारे चारशे शेतकरी सहभागी झाले होते. विद्या कहांडळ यांनी सूत्रसंचालन तर बी. पी. रायते यांनी आभार मानले.

Web Title: State level seminars on Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.