वीजबिल माफीबाबत वंचित बहुजन आघाडीचे तहसीदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 03:30 PM2020-08-01T15:30:23+5:302020-08-01T15:33:04+5:30

देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तहसीदारांना निवेदन देण्यात आले.

Statement of deprived Bahujan Aghadi to Tehsildar regarding electricity bill waiver | वीजबिल माफीबाबत वंचित बहुजन आघाडीचे तहसीदारांना निवेदन

तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे मधुकर कडलग व कार्यकर्ते.

googlenewsNext
ठळक मुद्देबिलं रिडींग न घेता अंदाजे भरमसाठ वीज बिलं आकारण्यात येत आहे.

देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तहसीदारांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांनी सरासरी वीज बिले हाती पडताच ग्राहक हैराण होत आहेत. त्यात एक एप्रिलपासून वीजेचा नविन दर लागू झाला आणि वीज बिलात वाढ झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. एकीकडे इतर राज्यात वीज बिले माफ व सवलत मिळत असताना महाराष्टÑात मात्र वाढून आलेल्या वीजबिलामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.
गेल्या मार्च महिन्यापासून कोविड - १९ च्या महाभयंकर विषाणूमुळे संपूर्ण देशासह राज्यतही ताळेबंदी करण्यात आली. आजही ती परिस्थिती कायम असून संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार, मजूर, शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. अशातच वीज वितरण कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे बिलं रिडींग न घेता अंदाजे भरमसाठ वीज बिलं आकारण्यात येत आहे. गोरगरीब, शेतकरी मजूर वर्गाकडे काम धंदा नसल्यामुळे घरगुती बिले, शेतपंपाची बिले सरसकट माफ करावीत असे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नावाने तहसीलदार दीपक गिरासे यांना वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित आघाडीचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काशीद, तालुकाध्यक्ष मधुकर कडलग, तानाजी गांगुर्डे, भागवत गांगुर्डे, श्याम काशीद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Statement of deprived Bahujan Aghadi to Tehsildar regarding electricity bill waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.