भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधादेण्यासाठी ग्रामपंचायतींची निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 07:21 PM2021-04-07T19:21:17+5:302021-04-07T19:22:14+5:30

सायखेडा : म्हाळसाकोरे आरोग्य केंद्र अंतर्गत जवळपास तेरा गावे येत असल्यामुळे एकाच ठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जेष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास होतो म्हणून भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधा उपलब्ध करावी यासाठी भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर, तळवाडे, निपाणी पिंपळगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी म्हाळसाकोरे येथे वैद्यकीय अधिकारी सानप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलीआहे.

Statement of Gram Panchayat for providing vaccine facility at Bhendali Sub Health Center | भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधादेण्यासाठी ग्रामपंचायतींची निवेदन

भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधा उपलब्ध करण्यासाठी चार ग्रामपंचायतिची निवेदनाद्वारे मागणी करतांना पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देद्यकीय अधिकारी सानप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलीआहे.

सायखेडा : म्हाळसाकोरे आरोग्य केंद्र अंतर्गत जवळपास तेरा गावे येत असल्यामुळे एकाच ठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जेष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास होतो म्हणून भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधा उपलब्ध करावी यासाठी भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर, तळवाडे, निपाणी पिंपळगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी म्हाळसाकोरे येथे वैद्यकीय अधिकारी सानप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलीआहे.

ग्रामीण भागात एकाच आरोग्य केंद्रात अनेक गावे येतात सकाळी १० वा लसीकरण सुरु होते. मात्र नंबर लावण्यासाठी नागरिक सकाळी ८ वा हजर होतात. मोठया प्रमाणात गर्दी होते शिवाय नागरिकांना ऐन उन्हात तासंतास ताटकळत बसावे लागते
घरचे एकदा सोडून गेले की लसीकरण होत नाही तो पर्यंत घ्यायला येत नाही तिथे थांबू शकत नाही त्यामुळे वृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय एकाच ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे. शासन कोरोना होऊ नये म्हणून गर्दी करू नका असे आवाहन करते मात्र प्रत्यक्ष गर्दी होईल असे नियोजन शासनाकडून होत असेल तर कोरोना आटोक्यात कसा येणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

अनेक वृद्ध आणि दुर्धर आजारी नागरिक इतक्या दूर जाऊ शकत नाही, घरच्यांना घेऊन जावे लागते त्यामुळे आणखी गर्दी वाढत आहे. परिसरात भेंडाळी उपकेंद्र येथे लसीकरण मोहीम सुरु केली तर गर्दी कमी होईल नागरिकाना प्रवास जवळ होईल शिवाय लवकर सर्व नागरिकांना लस मिळेल, सावली किंवा पिण्याचे पाणी प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी येथे लसीकरण सुरु करावे अशी मागणी केली आहे.

सदर निवेदनाच्या प्रति आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, गटविकास अधिकारी संदीप कराड यांना पाठवल्या आहेत. यावेळी भेंडाळीचे उपसरपंच सोमनाथ खालकर, महाजनपूरचे सरपंच संतोष दराडे, राजेश सांगळे, संजय खालकर, भगवान चव्हाण, अरिफ इनामदार, किसन खालकर, शिवाजी खाडे पी एम खाडे यासह पदाधिकारी उपस्थिती होते.

 

Web Title: Statement of Gram Panchayat for providing vaccine facility at Bhendali Sub Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.