पावसाच्या पाण्याची विल्हेवाट तत्काळ लावण्यासाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:06 PM2020-06-18T22:06:18+5:302020-06-19T00:18:26+5:30
मालेगाव : येथील सोयगावातील विष्णुनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने महानगरपालिका आयुक्त दीपक कासार यांना दिले.
मालेगाव : येथील सोयगावातील विष्णुनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने महानगरपालिका आयुक्त दीपक कासार यांना दिले. मालेगाव महानगर- पालिकेच्या हद्दीतील सोयगावमधील विष्णुनगर, योगायोग मंगल कार्यालय परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होते. या परिसरात दर पावसाळ्यात पाणी साचून ते घरांमध्ये शिरते. संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान होते. अन्न व पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
निवेदनावर निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रीतेश शर्मा, दिनकर गायकवाड, हर्षल गायकवाड, योगेश शर्मा, नम्रता शर्मा, दीपक जाधव, शालिनी जाधव, रवींद्र विसपुते, अनिता विसपुते, छोटू चव्हाण, शीतल चव्हाण, कौतिक देवरे, सुलोचना देवरे, यशवंत पवार, पुष्पा पवार, वाल्मीक मोरे, छाया मोरे, विनायक पवार, लाराबाई पवार, गोरख राणे, आशाबाई राणे, माधुरी निकम आदींच्या स्वाक्षºया आहेत.महानगरातील महत्त्वाचा भाग असलेल्या सोयगाव विष्णुनगर परिसरात पावसाळ्यात पाणी साचून रस्ते बंद झाल्याने शहराशी संपर्कतुटतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. वृद्धांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पाइपलाइनमधून हेच खराब पाणी नळांना येते. परिसरात साथीच्या आजाराने ग्रस्त होण्याचे प्रमाण वाढते.
त्यामुळे साचलेले पाणी गटारी सेक्शन पंप लावून पाणी उपसावे व पावसाळ्यात साचणाºया पाण्यापासून कायमची सुृटका करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.