पालकमंत्र्यांसह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींना मराठा समाजाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:15+5:302021-06-20T04:12:15+5:30

नाशिक : राज्यभरात ५८ मूक मोर्च काढल्यानंतरही समाजाला आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हानिहाय मूक ...

Statement of Maratha community to the people's representatives from all over the district including the Guardian Minister | पालकमंत्र्यांसह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींना मराठा समाजाचे निवेदन

पालकमंत्र्यांसह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींना मराठा समाजाचे निवेदन

Next

नाशिक : राज्यभरात ५८ मूक मोर्च काढल्यानंतरही समाजाला आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हानिहाय मूक आंदोलन करण्याची घोषणा केली असून, कोल्हापूरनंतर दुसरे मूक आंदोलन नाशिकमध्ये होणार आहे. या आंदोलनात सर्व लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणाविषयी त्यांची व त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले असून, त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधींना आंदोलनस्थळी उपस्थित राहून भूमिका मांडण्यासाठी निवेदन दिले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २१) सकाळी १० वाजता गांगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मैदानावर संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनस्थळी उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका मांडली. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, सुभाष भामरे, भारती पवार यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, राहुल आहेर, मौलाना मुक्ती सय्यद, सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांच्यासह आजी-माजी आमदारांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिली.

===Photopath===

190621\19nsk_59_19062021_13.jpg

===Caption===

पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, आशिष हिरे, राजू देसले, पुंडलिक बोडके,  रंजन ठाकरे

Web Title: Statement of Maratha community to the people's representatives from all over the district including the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.