टाळ-मृदंगाच्या गजरात वीज समस्यांंबाबत मनसेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:50+5:302020-12-04T04:37:50+5:30
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा व वाढीव पाठवलेली वीज देयके रद्द करावीत या मागणीसाठी मनसे विधानसभा अध्यक्ष ॲड. दिलीप ...
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा व वाढीव पाठवलेली वीज देयके रद्द करावीत या मागणीसाठी मनसे विधानसभा अध्यक्ष ॲड. दिलीप केदार, तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उपअभियंता ऋषिकेश खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले. निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये, रोहित्र जळाल्यानंतर ४८ तासांत बसवून मिळावा, रोहित्र ऑइलची दुरुस्ती दर सहा महिन्यांत करण्यात यावी, जुन्या झालेल्या वीजवाहिनी बदलण्यात याव्यात, रोहित्र स्टॅण्डबाय ठेवण्यात यावा. त्याकरिता शेतकऱ्यांकडून कुठलीही अतिरिक्त वसुली करण्यात येऊ नये, रात्रीचे भारनियमन रद्द करून कृषिपंपास नियमित वीजपुरवठा करावा. घरगुती मीटर रीडिंग व कृषिपंपाचे रीडिंग घेताना ते घर मालक अथवा शेतकऱ्यांच्या समक्ष घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष निखिल लहामगे, महिला तालुकाध्यक्ष ॲड. भाग्यश्री ओझा, मालती कांबळे, उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव, लखन खर्डे, प्रदीप लोणारे, एकनाथ दळवी, भिवाजी शिंदे, चंद्रभान ताजनपुरे, सुभाष आव्हाड, प्रकाश शेळके, रामनाथ सांगळे, शांताराम आव्हाड, सोपान आव्हाड, भास्कर आव्हाड, शिवाजी सांगळे, सुभाष भालेराव, गोरख जाधव, भिकाजी आव्हाड, ज्ञानेश्वर शेळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
031220\03nsk_2_03122020_13.jpg
===Caption===
सिन्नर येथील महावितरण कार्यालयासमोर टाळ-मृदंगाच्या गजरात वीज समस्येबाबतचे निवेदन वीज वितरण कंपनीचे उपअभियंता ऋषीकेश खैरनार यांना देताना मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.०३ सिन्नर २