मुस्लीम बांधवांचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:10 PM2020-09-07T21:10:16+5:302020-09-08T01:16:39+5:30
चांदवड : येथे मुस्लीम आरक्षणाबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांना मुस्लिम बांधवांनी मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे दिले.
चांदवड : येथे मुस्लीम आरक्षणाबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांना मुस्लिम बांधवांनी मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे दिले.
या शिष्टमंडळात अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अॅड. अन्वर पठाण, शहराध्यक्ष अनिस शहा, अल्ताप तांबोळी, अशपाक खान, हाजी नासीर शरीफखान, जाहीद घासी, अजीम शेख, वसीम शेख, परवेज खान आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिशय मागास झाली असल्याने त्या आधारावर शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन तहसीलदार पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर अझर पठाण, इद्रीस मीरखान, साजीद खान, जहीर खलील पटेल, राजीक शेख, सय्यद जमील, शकील शेख, मोसीन शेक, हाजी जहीर पटेल, फैजान खान, फैरमान शेख, शफक्म कुरेशी, युनूस राजू शेख, मुकर कामी आदीं च्या सह्या आहेत.