शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 11:06 PM2021-06-13T23:06:40+5:302021-06-14T00:25:47+5:30
पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी निगडित असलेल्या विविध समस्यांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्राथमिक ...
पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी निगडित असलेल्या विविध समस्यांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने निवेदनाद्वारे केली आहे.
शुक्रवारी (दि. ११) राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये शिक्षकांचे वेतन किमान पाच तारखेपर्यंत व्हावे, विस्ताराधिकारी मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती करणे, निवडश्रेणी चटोपाध्याय प्रस्ताव तालुकास्तरावरुन तत्काळ मागवण्यात घेऊन पुढील कार्यवाही करणे, पगाराशिवाय असणारी फंड प्रकरणे, मेडिकल बिले, निकाली काढणे, कोरोनाकाळात ड्यूटी केलेल्या शिक्षकांना मे आणि जून महिन्याचा वाहनभत्ता देण्यात यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी राजीव म्हैसकर, स्वीय सहायक जी. पी. खैरनार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, राज्य सदस्य मिलिंद गांगुर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन ताकाटे, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, चंद्रशेखर ढाबळे, धनंजय आहेर, दीपक सोनवणे, उमेश बैरागी, देवीदास पवार, युवराज पवार, प्रदीप पेखळे, दीपक देवरे, प्रदीप पेखळे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.