राज्य शिक्षक सेनेचे विविध मागण्यांप्रश्नी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 04:38 PM2020-09-19T16:38:31+5:302020-09-19T16:39:08+5:30

दाभाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे आस्थापनाप्रमुख पाटे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

Statement on various demands of State Shikshak Sena | राज्य शिक्षक सेनेचे विविध मागण्यांप्रश्नी निवेदन

शिक्षक सेनेतर्फे शिक्षण विभागप्रमुख पाटे यांना शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याचे निवेदन देताना अनिल जगताप, मिलिंद भामरे, संजय शेवाळे, प्रदीप जाधव, संजय देवरे, संजय साळुंखे आदी.

Next
ठळक मुद्दे शैक्षणिक अर्हता वाढ नोंद यासह विविध विषयांवर चर्चा

दाभाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे आस्थापनाप्रमुख पाटे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी सेवापुस्तक अद्ययावत करणे, गोपनीय अहवाल, निवडश्रेणी, मेडिकल बिल, शासकीय विमा, गटविमा, रजा नोंद, शैक्षणिक अर्हता वाढ नोंद यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षक सेनेच्या वतीने विभागप्रमुख पाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे विभागीय उपाध्यक्ष अनिल जगताप, माजी तालुकाध्यक्ष अध्यक्ष मिलिंद भामरे, माजी जिल्हा कोषाध्यक्ष संजय बा शेवाळे, तालुका सरचिटणीस प्रदीप जाधव, तालुका कार्याध्यक्ष संजय देवरे, तालुका कोषाध्यक्ष संजय साळुंके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Statement on various demands of State Shikshak Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.