शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:05 AM2020-08-28T01:05:48+5:302020-08-28T01:06:11+5:30

राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Statewide bell ringing movement on Saturday | शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन

मंदिर उघडा या मागणीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तुषार भोसले. समवेत सतीश शुक्ल, रामसिंग बावरी, निवृत्तीनाथ महाराज रायते, महंत भक्तीचरणदास, आमदार देवयानी फरांदे, गिरीश पालवे, आमदार राहुल ढिकले आदी.

Next

पंचवटी : राज्यातील देवस्थान सुरू करण्यासाठी मागणी करूनही राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत मंदिर, मठ उघडण्यासाठी येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थान, भजन पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एक मुखाने मागणी असताना राज्यातील सरकार ते मान्य करत नाही म्हणूनच शासनाच्या विरोधात लढा देण्यासाठी राज्यातील प्रमुख धार्मिक,अध्यात्मिक संघटना, संस्था प्रमुख देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पंथ संप्रदायाच्या प्रमुख धर्माचाऱ्यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलनाचा निर्णय घेतला
आहे. शनिवारी सकाळी सर्व साधू महंत व भाविकांनी आंदोलनात सहभागी होऊन घंटानाद करून शासनाला मंदिर सुरू करण्यासाठी भाग पाडू असे भोसले यांनी शुक्ल यजुर्वेद मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला आमदार देवयानी फरांदे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, महंत भक्ती चरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, निवृत्तीनाथ महाराज रायते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, रामसिंग बावरी, देवदत्त ब्रम्हाजी आदी उपस्थित होते.

Web Title: Statewide bell ringing movement on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.