शेतातून सहा गायींसह वासराची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:54 PM2019-12-09T12:54:06+5:302019-12-09T12:54:35+5:30
ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे.
ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे. चोर्यांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
येथील शेतकरी राजेंद्र अहिरे यांचेकडे रविवारी विवाह सोहळा होता .दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी सहा वाजता दूध काढण्यासाठी ते शेतातील खळ्यात गेले असता खळ्यातील सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्र ार दिली. अिहरे हे शेती सोबत दूध विक्र ी चा जोड व्यवसाय करत . दूध विक्र ी करून त्यांना प्रपंचाला मोठा हातभार लागत होता . सर्वच गायी चोरट्यांनी लंपास केल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनास्थळी लखमापूरचे पोलिस कर्मचारी कदम व अहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
याच शिवारात शेतातील घरा समोरून आठ दिवसापूर्वी पंडित अहिरे यांची गाय चोरट्यांनी चोरून नेली आहे . गावात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या कामी सटाणा येतील पोलीस उपननिरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी लवकर सी सी टीव्ही बसविण्याचे सांगितले आहे .तर यासाठी निधी ही मंजूर झाला असून लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे सरपंच सरला अहिरे यांनी सांगितले.