मलनिस्सारण केंद्राची दुर्गंधी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:18+5:302021-06-04T04:12:18+5:30
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रातून दुर्गंधी अधिक प्रमाणात येत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. पावसाच्या ...
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी येथील मलनिस्सारण केंद्रातून दुर्गंधी अधिक प्रमाणात येत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. पावसाच्या सरी काेसळताच या केंद्राच्या परिरसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. विशेषत: पहाटेच्या सुमारास या केंद्रातून दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते.
---
वडाळागाव परिसरात गोठ्यांमुळे दुर्गंधी
नाशिक : वडाळा परिसरातील अनधिकृत गोठ्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या भागातील गोठ्यांचे मल-मूत्र अनेक ठिकाणी रस्त्यांवर येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांकडून या भागातील अनधिकृत गोठ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
--
शरयुनगर रस्त्यावर फूटपाथची मागणी
नाशिक - इंदिरानगर भागातील शरयुनगर रस्त्यावर फूटपाथ तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. या भागात नव्याने निवासी वसाहती विकसित होत आहेत. त्यामुळे या भागातील वर्दळ वाढली असून वाहनांमुळे पदचाऱ्यांना अडसर होऊ नये यासाठी फूटपाथ तयार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.