घोटी : ओबीसींचे स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील सर्व पक्षीय ओबीसी घटक व अखिल भारतीय समता परिषदेच्या नेतृत्वाखाली मुंबई-नाशिक-सिन्नर चौफुलीवर आक्रोश आंदोलन करून महामार्ग रोखण्यात आला.
माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. या आंदोलनात ओबीसी प्रवर्गातील समाज घटक सहभागी झाले होते. या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी सभापती भगवान आडोळे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कीर्वे, माजी सरपंच रामदास शेलार, माजी सभापती रघुनाथ तोकडे, भगीरथ मराडे, नगरसेवक संपत डावखर, यशवंत दळवी, उमेश कस्तुरे, नारायण वळकंदे, मुलचंद भगत, विष्णू चव्हाण, अनिल भोपे, सरपंच रामदास भोर, सदस्य श्रीकांत काळे, हरिश्चंद्र चव्हाण, मिलींद हिरे, वसीम सैयद, विठ्ठल काळे, तुकाराम वारघडे, मुन्ना शेख, खंडू परदेशी, कृष्णा भगत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (१७ घोटी)
===Photopath===
170621\17nsk_7_17062021_13.jpg
===Caption===
१७ घोटी