महागाईविरोधात राष्ट्रवादीचा कळवणला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:33 PM2021-07-05T18:33:20+5:302021-07-05T18:34:13+5:30

कळवण : गॅस, डिझेल, पेट्रोल या जीवनावश्यक वस्तूंच्या केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ दरवाढीविरोधात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवण बसस्थानकासमोर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the NCP's report against inflation | महागाईविरोधात राष्ट्रवादीचा कळवणला रास्ता रोको

महागाईविरोधात राष्ट्रवादीचा कळवणला रास्ता रोको

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी

कळवण : गॅस, डिझेल, पेट्रोल या जीवनावश्यक वस्तूंच्या केंद्र सरकारने केलेल्या भरमसाठ दरवाढीविरोधात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवण बसस्थानकासमोर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

केंद्र शासनाने गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीत केलेली दरवाढ व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बसलेला आर्थिक भुर्दंड, कोरोनाकाळात घटलेले आर्थिक उत्पन्न याच्यामुळे सर्वसामान्य जनता या महागाईने बेजार झालेली आहे. केंद्र शासनाने तत्काळ डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्या किमती कमी करून सर्वसाधारण जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते हेमंत पाटील, संतोष देशमुख, प्रताप पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुप्ते यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संदीप पगार, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा सपना पगार, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष अलका कनोज, विलास रौंदळ, रविकांत सोनवणे, सागर खैरनार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अक्षय बोरसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- ०५ कळवण रास्ता रोको

कळवण येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलनप्रसंगी तहसीलदारांना निवेदन देताना राजेंद्र भामरे, जितेंद्र पगार, संदीप वाघ, अलका कनोज, सपना पगार, संदीप पगार आदी.
 

Web Title: Stop the NCP's report against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.