पोकलेन मशिनरीवरील दंडात्मक कारवाई थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:26 AM2019-09-19T00:26:49+5:302019-09-19T00:27:38+5:30
पोकलेन मशिनरींची वाहतूक करताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांना देण्यात आले आहे.
पंचवटी : पोकलेन मशिनरींची वाहतूक करताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांना देण्यात आले आहे.
निवेदनात अर्थमुव्हर्स मशीनची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरची रुंदी ८ फूट आहे. १९५२ आणि १९८९ वर्षात केलेल्या कायद्यानुसार रुं दी ठेवण्याचे बंधन आहे. मात्र नवीन तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे अर्थमुव्हर्स मशिनरीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आज निर्माण झालेली सर्व मशिनरी (पोकलेन) आठ फूट रुं दीच्या ट्रेलरमध्ये बसत नाही. त्यामुळे उपलब्ध ट्रेलरमध्ये वाहतूक करावी लागते. अशी वाहतूक करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा वाहनांना हजारो रु पये दंड ठोठावतात. वास्तविक पाहता ट्रेलर बनवणाºया कंपन्यांनीही आठ फुटांपेक्षा जास्त रुंदीचे ट्रेलर बनवले नाही. मग वाहतूक कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रमाणे विंडमिलचे पंखे, दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक करणारे कंटेनरांना या कायद्यातून सूट देण्यात आली आहे. अर्थमुव्हर्स मशिनरीची वाहतूक करणाºया ट्रेलरलादेखील सूट द्यावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे कल्पेश भुतडा, योगेश नारंग, अब्बास मुजावर, स्वप्नील मोहोरील, फारूक शेख, अमोल विंचू आदींसह सदस्यांनी केली आहे.