गोदावरीत जाणारे सांडपाणी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:00 AM2020-02-07T00:00:19+5:302020-02-07T00:57:23+5:30
गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी तत्काळ थांबवा. तसेच मलनिस्सारण केंद्रातील यंत्रणा अद्ययावत करून निळ्या रेषेत नदीच्या जागेत होणारे सीमेंट-कॉँक्रीटचे बांधकाम तातडीने रोखण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मलनिस्सारण केंद्रातून सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया केली जात नसेल तर यासंबंधित ठेकेदाराला दोषी धरून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला.
नाशिक : गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी तत्काळ थांबवा. तसेच मलनिस्सारण केंद्रातील यंत्रणा अद्ययावत करून निळ्या रेषेत नदीच्या जागेत होणारे सीमेंट-कॉँक्रीटचे बांधकाम तातडीने रोखण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मलनिस्सारण केंद्रातून सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया केली जात नसेल तर यासंबंधित ठेकेदाराला दोषी धरून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला.
ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरीचे जलकलश घेऊन निघालेल्या अविरल निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेत भुजबळ यांनी गुरुवारी (दि.६) सहभाग घेतला. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, याचिकाकर्ता गोदाप्रेमी राजेश पंडित यांच्यासमवेत त्यांनी गोदावरीच्या काठावर जाऊन पाहणी केली.