नाशिक : केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदला चांदवड, देवळा, मनमाड आदी ठिकाणी धरणे आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. चांदवड येथील गणूर चौफुलीजवळ तालुका किसान सभा व जनवादी महिला संघटना, राष्टÑीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात हनुमंत गुंजाळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संजय जाधव, धर्मराज शिंदे, राजाराम ठाकरे, शब्बीर सय्यद , ताईबाई पवार, बाळू सोनवणे, रूपचंद ठाकरे, शंकर गवळी, दौलत वटाणे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार प्रदीप पाटील व पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, देशातील जनता आर्थिक मंदी, बेरोजगारी यांना तोंड देत असून, जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत.रास्ता रोको आंदोलनाच्या वतीने केलेल्या मागण्यांमध्ये गायरान जमिनी कसणाºयाच्या नावे कराव्यात, वनाधिकार कायद्यानुसार कलम १९ मध्ये सुचविलेल्या पुराव्यातील दाव्यासोबत दोन पुरावे सादर केलेल्या दावेदारांचे दावे मंजूर करावे, मंजूर दावेदारांच्या ताब्यातील चार हेक्टरपर्यंतची वनजमीन मंजूर करून सातबाराला खातेदार सदरी नोंद करावी, तालुक्यातील जीर्ण झालेले रेशनकार्ड त्वरित बदलून द्यावे, विधवा व निराधार यांना दरमहिन्याला १५०० रुपये पेन्शन द्यावी, चांदवड वनपाल यांच्याकडून स्थानिक प्लॉट पाहणी करून जीपीएस मोजणी तातडीने करण्यात यावी, गटविकास अधिकारी पूर्ण तालुक्याच्या ड च्या याद्या देण्यात याव्यात.प्रत्येक गरजू लाभार्थींना ड च्या यादीत नाव समाविष्ट करावे, सर्व क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कामगार कष्टकऱ्यांना दरमहा २१ हजार किमान वेतन लागू करावे व ते महागाई निर्देशंकाशी जोडावे, सर्व कामगारांना सार्वत्रिक सुरक्षा लागू करण्यात यावी, शेतमजूर, गरीब शेतकरी व कंत्राटी असंघटित कामगारासहीत दहा हजार पेन्शन सुरू करावी आदी मागण्या करण्यात आल्या असून, निवेदनावर नंदा मोरे, दत्तू भोये, सुरेश चौधरी, सुरेश पवार, शांताराम गावित, जयराम गावित, भाऊसाहेब सोनवणे, कारभारी माळी, गणपत गुंजाळ, केदू गांगुर्डे, शिवाजी सोनवणे यांच्या सह्या आहेत.किसान सभेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, किरण डावखर, सुकदेव केदारे, आर.ए. शेख, लहानू ठाकरे, नानासाहेब मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने विनाअटी व शर्ती कर्जमुक्ती द्यावी तसेच बी-बियाणे, खते, कीटकनाशके व शेती यंत्राच्या किमतीवर नियंत्रण व एसटीतून सूट मिळावी तसेच साठ वर्षांपेक्षा जास्त शेतकºयांना दहा हजार रुपये पेन्शन, पीकविमा योजनेला शेतकºयांच्या अनुकूल बनविणे, क व हप्ते सरकारने भरणे, कृषी वस्तू, दुग्ध, कुक्कुटपालन यांना आरसीईपीडब्ल्यू टीओमधून वगळावे आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी व कुटुंबाला दहा लाखांची भरपाई मिळावी, कर्जमुक्ती योजनेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्जदारांचा समावेश केला आहे. पीककर्जासोबत जलसिंचनव मध्यम मुदतीचे कर्ज शेतीपूरक उद्योग, कर्जमुक्ती योजनेत घ्यावे या व इतर मागण्यांचा समावेश या निवेदनात केला आहे.कर्मचाºयांचा मोर्चाचांदवड नगर परिषदेच्या कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि. ८) कामबंद आंदोलन करत कर्मचाºयांना कायमस्वरूपी कामावर घ्या, दहा हजार रुपये पेन्शन द्या आदी मागण्यांसाठी चांदवड नगर परिषद कार्यालयावर मोेर्चा काढला. त्यानंतर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी अभिजित कदम यांना २३ मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनावर अनिल गायकवाड, कामिनी सोदे, शरद धोतरे, अर्जुन गायकवाड, सुचिता शेजवळ आदींसह महिला व पुरुष कर्मचाºयाच्या सह्या आहेत. यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांनी पाठिंबा दिला. चांदवड तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना संपाबाबत निवेदन दिले व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांवरील कर्जधारकांचा तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांचा समावेश करावा या प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापीभारत बंदची हाक दिली होती.
चांदवडला किसान सभेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:46 PM
चांदवड येथील गणूर चौफुलीजवळ तालुका किसान सभा व जनवादी महिला संघटना, राष्टÑीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.
ठळक मुद्देदेशव्यापी संपाला पाठिंबा : देवळ्यात निवेदन; भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भाववाढीचा निषेध