वणीत खड्डे दुरुस्तीसाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:23 AM2019-08-14T01:23:02+5:302019-08-14T01:24:07+5:30
शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती आली आहे.
वणी : शासकीय दूध कार्यालय ते महाविद्यालय परिसरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनानंतर खड्डे बुजविण्याच्या कामास गती आली आहे.
वणी - कळवण रस्त्यावरील शासकीय दूध कार्यालय ते वणी बसस्थानक परिसरात अतिवृष्टीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली व मोठमोठे व खोल खड्डे ठिकठिकाणी पडले होते. त्यामुळे वाहन चालविणे म्हणजे अपघातांना निमंत्रण अशी अवस्था निर्माण झाली होती. पाठपुरावा करूनही संबंधित विभाग काही करत नसल्याच्या भूमिकेमुळे झिरवाळ व कार्यकर्त्यांनी या मार्गावरील खड्डे स्वत: बुजविण्याचा निर्णय घेतला. पाट्या पावडे टिकाव या वस्तू आणण्यात आल्या. ही माहिती संबंधिताना मिळाली. तत्परतेने अधिकारी घटनास्थळी आले व पाऊस असल्यामुळे खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी विलंब झाल्याची माहिती देत दिलगिरी व्यक्त केली व खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. रास्ता रोको आंदोलनात विलास कड, मनोज शर्मा, गंगाधर निखाडे, मधुकर भरसठ, देवेंद्र गांगुर्डे, शरद महाले व कार्यकर्ते तसेच वाहनचालकांनी भाग घेतला.