अभोण्यात कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:54 PM2021-04-10T18:54:04+5:302021-04-10T18:54:56+5:30
अभोणा : गत आठवड्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळत कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
Next
ठळक मुद्देविकेंड लॉकडाऊनला येथे १०० टक्के प्रतिसाद
अभोणा : गत आठवड्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ व व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळत कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शासनाच्या शनिवार, रविवार विकेंड लॉकडाऊनला येथे १०० टक्के प्रतिसाद देत शहरातील दवाखाने व मेडिकल सेवा वगळता किराणासह सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली असून, त्यामुळे शहरात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे. सर्वच ग्रामस्थांनी आपल्या परिवारासोबत घरी राहणे पसंत केल्याने गावात पूर्णपणे शांतता आहे.