नाशिक : शिक्षण घेताना भारतीय परंपरांचा आदर करू न त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिपूर्णता येईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.केटीएचएम महाविद्यालयातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.१९) समाज दिन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. व्यासपीठावर रावसाहेब कोशिरे, प्रा. के. डी. शिंदे, अॅड. एकनाथ पगार, अलकाताई गुंजाळ, पद्माकर पाटील, अॅड. नामदेव शिंदे, कैलास सोनवणे, चांगदेवराव ढिकले आदी उपस्थित होते. डॉ. पंडित विद्यासागर यांनी यावेळी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केटीएचएममधील प्र्रवास उलगडवताना महाविद्यालयाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी केले. डॉ. जे. एस. आहेर यांनी आभार मानले.भारतीय नौदलात निवड झालेल्या सूरज भगत या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेते तसेच सर्व पदवी व पदव्युत्तर विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:09 AM