धबधब्यात उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:24 AM2019-11-30T01:24:59+5:302019-11-30T01:27:12+5:30
सुरगाणा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (बे.) येथील दहावीच्या विद्यार्थिनीने केळावण येथील भिवतास धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला तुकाराम गायकवाड (१६, रा.खोकरविहीर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
सुरगाणा : तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेपाडा (बे.) येथील दहावीच्या विद्यार्थिनीने केळावण येथील भिवतास धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रकला तुकाराम गायकवाड (१६, रा.खोकरविहीर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून तिने जीवन संपविल्याची चर्चा आहे. मात्र, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात आहे.
सुरगाणा तालुक्यातील केळावण गावाजवळील भिवतास धबधबा आहे. या धबधब्याच्या कड्यावरून चंद्रकलाने उडी घेतल्याचे बोलले जात आहे. चंद्रकला मंगळवारी (दि.२६) शाळेत जाते असे सांगून गेली होती. मात्र, घराबाहेर पडल्यावर ती शाळेत न जाता थेट भिवतास धबधब्याकडे गेली आणि उडी मारून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिचे चप्पल व कपडे धबधब्याच्या काठावर आढळले आहेत. दरम्यान, संध्याकाळी ६ वाजले तरी ती घरी आली नाही म्हणून तिच्या
घरच्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास शोध घेण्यासाठी धबधब्याचा परिसर व जंगल पिंजून काढले; परंतु ती कोठेही आढळून आले नाही, मात्र काही व्यक्तींनी एका मुलीचा
मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती तिच्या नातेवाइकांना
दिली. कुटुंबीयांनी तत्काळ
धबधबा गाठला.
मृतदेह त्या धबधब्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला, परंतु मृतदेह सहजासहजी काढणे शक्य नव्हते. तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी संपर्क करून एका पथकास पाचारण केले, मात्र तोपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्र वारी (दि.२९) सकाळी शोधकार्य पुन्हा सुरू करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. चांदोरी येथील शोधपथकाचे अध्यक्ष सागर गडाख, बाळू आंबेकर, फकिरा धुळे, विलास गांगुर्डे, सुरेश शेटे, शरद वालघडे यांच्यासह सुरगाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक आर. बी. लोखंडे, पोलीसपाटील विजय चौधरी, नामदेव पाडवी, मनोहर जाधव यांनी शोधमोहीम पार पाडली. ग्रामीण रु ग्णालय बाºहे येथील डॉ. राणी धूम, केदार झिरवाळ यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.