विद्यार्थ्यांची आजपासून एकाच वेळी चाचणी
By admin | Published: April 6, 2017 12:32 AM2017-04-06T00:32:59+5:302017-04-06T00:33:21+5:30
पेठ : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक कार्यक्र मांतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रातील लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत
पेठ : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक कार्यक्र मांतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रातील लेखी परीक्षांच्या (संकलित मूल्यमापन चाचणी) तारखा जाहीर झाल्या आहेत. प्रथम भाषा विषयाची ६ एप्रिल, तर गणित विषयाची परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. एकाच वेळी राज्यातील एक कोटी ६० लाख विद्यार्थ्यांच्या चाचणी मूल्यमापनासाठी विद्या परिषदेने नियोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत (विद्या परिषद) राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्र मांतर्गत पायाभूत चाचण्या घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम भाषेतील मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, गुजराती, सिंधी, कन्नड, तेलुगू अशा आठ भाषांसह गणित या दोन विषयांचे राज्यातील एक कोटी ६० लाख विद्यार्थ्यांचे एकाच वेळी मूल्यमापन केले जाणार आहे.
यावर्षी जुलै महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांची एकाच वेळी कलचाचणी घेण्यात आली. मागील वर्षाचा अनुभव पाठीशी असल्याने विद्या परिषदेने प्राथमिक चाचणी, विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सोडविण्याची क्षमता तपासणे उत्तरपत्रिकांचे विश्लेषणासह प्रश्नपत्रिकेला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील सर्वाधिक मराठी विषयांच्या प्रश्नपत्रिका वाटपही सुरू झाले असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, महापालिका शिक्षण विभागांना प्रश्नपत्रिकांचे संच शाळा स्तरावर पोहोच करण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती विद्या परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी दिली. (वार्ताहर)