विद्यार्थ्यांनी कलाविष्कारातून उलगडला शिक्षण प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:23 PM2018-03-12T15:23:25+5:302018-03-12T15:23:25+5:30
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील आयबीपीवायपी शिक्षणप्रणाली अंतर्गत अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांच्या माध्यामातून पहिली ते पाचवीर्पयतचा शिक्षण प्रवास उलगडताना समाजातील विविध समस्यांवरही प्रकाशझोत टाकला. सोबत विविध समूहनृत्ये, लोकगीत, मूक अभिनय सादर करून पारंपारिक कलांचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.
नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील आयबीपीवायपी शिक्षणप्रणाली अंतर्गत अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांच्या माध्यामातून पहिली ते पाचवीर्पयतचा शिक्षण प्रवास उलगडताना समाजातील विविध समस्यांवरही प्रकाशझोत टाकला. सोबत विविध समूहनृत्ये, लोकगीत, मूक अभिनय सादर करून पारंपारिक कलांचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.आयबीपीवायपी शिक्षणप्रणाली अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थ्यांचे प्रायमरी इयर्स प्रोग्राम (पीवायपी) चे शेवटचे वर्ष असते. या अनुषंगाने पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांनी शिकलेल्या पीवायपी शिक्षणाचा भाग म्हणून शाळेत आयोजित कार्यक्रमात विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. यात मुलांना स्वत:च्या संकल्पना, ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन यांचे संकलन व्हिज्युअल, विडंबनात्मक लेख आणि आयसीटी सादरीकरणाद्वारे प्रदिर्शत करण्याची संधी मिळाली.
विविध सामाजिक समस्यावर आधारीत हाऊ वुई ऑर्गनाइज आवर सेल्व्हज ही संकल्पना मुलांनी घेतली होती. यात विद्यार्थ्यांनी सोशल मिडिया आणि नेटवर्क, नैतिकता व जीवनमूल्य असे विषय निवडले होते.
मानवी जीवनावर विविध समस्यांचा होणारा परिणाम तसेच ते आटोक्यात आणण्यासाठीचे उपाय याचे अन्वेषण मुलांनी सर्वांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचा प्रवास त्यांनीच लिहिलेल्या इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतील कविता, नाट्यछटा, मूकाभिनय, नृत्य, एकांकीका आणि भाषण यांद्वारे पालकांसमोर सादर केले.
विद्यार्थ्यांनी पालकांसाठी प्रश्नमंजूषा तयार करून त्यांची स्पर्धा आयोजित केली. मूकाभिनय हे कार्यक्र माचे मुख्य आकर्षण ठरले.
या स्पर्धेत सर्व पालकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून आनंद घेतला आणि याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हे सादर करतांना मुलांनी आयसीटीची आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य वापरली. पाऊ टूल अनिमेट, मुव्ही मेकर, प्रेझी, एडिटिंग म्युङिाक व व्हिडिओ आणि कॉमिक मेकर टूल इत्यादी वेब टूल्सचा वापर केला होता.