मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील सुभाष देसाई : औद्योगिक संघटना पदाधिकाºयांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:26 AM2017-12-29T01:26:39+5:302017-12-29T01:28:13+5:30
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी बोलताना दिली.
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी बोलताना दिली.
नाशिक दौºयावर आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करताना नाशिकच्या विकासासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करीत आहे. त्यात प्रामुख्याने ओझरजवळ नाशिकपासून २२ किलोमीटरवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारणीच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी एसपीव्हीदेखील तयार झालेला असल्याचे सांगितले. आयटी पार्कची जागा इतर उद्योगांना देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. इमारतीच्या जागेचे दर कमी करण्यात येणार आहेत. राज्यात उद्योग उभारणीच्या उद्देशाने दिलेल्या जागेचा गैरवापर केला जात होता. तसे प्लॉट परत घेण्यात आले आहेत. राज्यात असे दोन हजार प्लॉट घेतले असून, नाशिक विभागातून ३० प्लॉट परत घेतलेले आहेत. ते पुढील प्रक्रियेतून वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन वानखेडे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. डी. रेंदाळकर, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, नाईसचे चेअरमन विक्रम सारडा, क्रेडाई अध्यक्ष सुनील कोतवाल, नेमिचंद पोद्दार, इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन नरेंद्र गोलिया, अतुल चांडक, हेमंत राठी, संजीव नारंग, नाशिक सिटीझन फोरमचे डॉ. नारायण विंचूरकर, हेमंत बक्षी, मधुकर ब्राह्मणकर, उदय खरोटे, खुशाल पोद्दार, उदय घुगे, आशिष नहार आदी उपस्थित होते. नाशिकच्या उद्योजकांच्या पुढाकाराने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात आलेल्या १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला तातडीने दिंडोरी परिसरात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत दिंडोरी परिसरातील पायाभूत सुविधा पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ लगेचच नवीन प्रकल्पांचा विचार केला जाणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.