आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरमधील अडचणींचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:04 AM2018-08-15T01:04:34+5:302018-08-15T01:04:48+5:30

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. या सॉफ्टवेअरमध्ये येणा-या अडचणींसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांनी मंगळवारी दिले.

Submit reports of the problems with the ATODCR software | आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरमधील अडचणींचा अहवाल सादर करा

आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरमधील अडचणींचा अहवाल सादर करा

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या आॅटोडीसीआर सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. या सॉफ्टवेअरमध्ये येणा-या अडचणींसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांनी मंगळवारी दिले.  स्थायी समितीची यापूर्वी तहकूब झालेली सभा मंगळवारी (दि.१४) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ यावेळी ‘लोकमत’मध्ये बांधकाम परवानगीसाठी दाखल करण्यासाठी असलेल्या आॅटोडीसीआरमधील अडचणींसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या मालिकेचे पडसाद उमटले. या सॉफ्टवेअरमधील दोषांमुळे अडचण होत असून, किरकोळ कारणांसाठी बांधकाम प्रकरणे नाकारली जात आहेत़ यामुळे व्यावसायिकांना पुन्हा तपासणी फीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे़ त्यामुळे या सॉफ्टवेअरमधील दोष दूर करावेत, अशी मागणी समितीचे सदस्य संतोष साळवे यांनी केली. पुष्पा आव्हाड यांनीदेखील समितीच्या समोर नगररचना विभागातील अडचणींचा पाढा वाचला़ एखाद्या इमारतीचे प्लींथपर्यंत बांधकाम होऊनही त्याची तपासणी करण्यासाठी अनेक महिने नगररचना विभागाचे अभियंते जात नाहीत़  या विभागाचे मनुष्यबळ घटविण्यात आल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्याचे आव्हाड म्हणाले. यासंदर्भात प्रशासनाने अहवाल सादर करावा, असे आदेश सभापती आडके यांनी यावेळी दिले.
दरम्यान, या बैठकीत वृक्षप्राधिकरण विभागाच्या कामकाजावर सदस्यांनी टीका केली़ धोकादायक झाडे तोडण्यासाठी प्रशासनाकडे अनेक अर्ज पडून आहेत परंतु त्यावर निर्णय होत नाही, अशी तक्रार मुशीर सय्यद यांनी केली़
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक झाडे पडण्यास सुरुवात झाली आहे़ मात्र, त्यावर महापालिका निर्णय घेत नाहीत, अशी टीका सदस्यांनी केली़ उद्यान विभागाचे अधीक्षक शिवाजी आमले यांनी सध्या वृक्षप्राधिकरण समितीचे अशासकीय सदस्य नियुक्त नसल्याने कामकाजात अडथळा येत असल्याचे मान्य केले़ येत्या तीन महिन्यांत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आमले यांनी सांगितले.
डास औषधे खरेदीचा विषय चर्चेत
यावेळी महापालिकेचा डास निर्मूलनासाठी औषधे खरेदी करण्याचा विषयही चर्चित ठरला. औषधे खरेदी करूनही शहरात डासांची संख्या कमी होत नाहीत तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्या यांसारखे आजार बळावले आहेत, अशी तक्रार त्यांनी केली. डास निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणी करणाºया ठेकेदाराला महापालिकेने नोटीस दिली होती, त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केल्यावर पुढील सभेत ठेकेदाराच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती आडके यांनी दिले़

Web Title: Submit reports of the problems with the ATODCR software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.